आता शेकडो कोटींचे भ्रष्टाचार नाहीत तर लोककल्याण योजना

शिर्डी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान शिर्डी जवळील काकडी येथे झालेल्या सभेत याआधीच्या भाजपेतर सरकारांनावर टिकेची झोड उठवली. या आधी महाराष्ट्राते शेकडो कोटींचे भ्रष्टाचार झाले तर आता आमच्या काळात शेकडो कोटींच्या लोककल्याण योजना आमलत आणल्या जातात असे प्रतिपादन करत त्यांनी भाजपाच्या कार्यकाळात झालेल्या लोककल्याणाच्या योजनांचा तपशील मांडला. या भाषणात पंतप्रधानांनी अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांवर टिकास्र सोडत, “शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी केलं काय?” असा सवालही उपस्थित केला.
शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधानांची सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलताना ते म्हणाले, आमचे सरकार ‘सबका साथ सबका विकास’च्या मंत्रावर चालते. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे. हेच आकडे आपण ऐकले असतील पण ते भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रक्कमांचे घोटाळे केले. त्यांनी फक्त घोटाळे केले आहे. पण आम्ही विकास करतोय.”
शरद पवारांवर टिका करताना मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री म्हणून काम करत होते व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपी वर धान्य खरेदी केले परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपया ंच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना पैशासाठी दलालांवर अवलंबून राहावं लागायचं, त्यांना महिनो-महिनो पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रब्बी पिंकासाठी एमएसपीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे, असही मोदी म्हणाले.
SL/KA/SL
26 Oct. 2023