आता केवळ १८ मिनिटात होणार माती परिक्षण
![आता केवळ १८ मिनिटात होणार माती परिक्षण](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/06/soil-testing.jpg)
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून शेती केल्यास अधिक उत्पादन घेणे नक्कीच शक्य आहे. त्यामुळे कोणतेही पिक घेण्याआधी माती परिक्षण करणे ही एक प्राथमिक महत्त्वाची बाब मानली जाते.जमिनीत कोणते घटक किती प्रमाणात आहेत, जमिनीला कोणत्या मूल्यद्रव्यांची गरज आहे, याची माहिती शेतकऱ्यांना जाणून घ्यायची असेल तर माती परीक्षण करणं आवश्यक असतं. परंतु सध्या माती परीक्षणासाठी लागणार वेळ आणि खर्च अधिक आहे. त्यामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाशचं प्रमाण किती आहे, याबद्दल शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळत नाही.परंतु आता दिल्ली येथील उपज कंपनीने केवळ १८ मिनिटात रिझल्ट देणारे माती परिक्षण तंत्र विकसित केले आहे.
त्यामुळे खतांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. परंतु आता या सगळ्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. देशात आधुनिक माती परीक्षण मशिन विकसित करण्यात येऊ लागले आहे. दिल्ली येथील उपज या कंपनीनं कमी वेळेत व कमी खर्चात माती परीक्षण करणारं मशिन बाजारात आणलंय.
भारतीय कृषी संशोधन परिषदेनं तयार केलेल्या सध्याच्या माती परीक्षण मशिनच्या तुलनेत उपजचं मशिन दिवसाला ५० परीक्षण करतं. तसेच फक्त १८ मिनिटांत परीक्षण करून देते. याआधी परीक्षणासाठी २ ते ३ तास लागत. मात्र या मशिनमुळे वेळ आणि खर्चात बचत होण्याचा दावा उपज या कंपनीने केला आहे.
SL/KA/SL
13 June 2023