आता युवतींना मिळणार सरकार कडून स्वरक्षणाचे धडे

 आता युवतींना मिळणार सरकार कडून स्वरक्षणाचे धडे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील पंधरा ते पंचवीस वयोगटातील साडे तीन लाख युवतींना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून , भविष्यात याचा समावेश अभ्यासक्रमात ही करण्याचा विचार आहे.

राज्यात महिला आणि मुलींवर वाढते अत्याचार तसेच हिंसाचार ही चिंतेची बाब असून त्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

यासाठी मुंबई विद्यापीठ , एस एन डी टी महाविद्यालय , स्त्री शक्ती आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांची मदत घेण्यात येणार आहे, राज्यातील साडे तीनशे तालुक्यात प्रत्येकी एक हजार तरुणींना हे सुरुवातीला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि ज्यांना अधिक शिक्षण हवे आहे त्यांना आणखी पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल असेही लोढा यांनी सांगितले. हे प्रशिक्षण मोफत दिले जाईल त्यासाठी जे सहकार्य करणार आहेत त्यांनाही पैसे दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे प्रशिक्षण देण्याचा समावेश भविष्यात शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येईल असा प्रयत्न केला जातो आहे असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

ML/KA/PGB
21 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *