आता एसटीची सुदधा नॉन एसी स्लीपर बस सेवा …

सिंधुदुर्ग, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सडक मार्गाने प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित सेवा म्हणून एसटीची सेवा मानली जाते. विविध प्रकारच्या बसेसची सेवा एसटी सध्या देत आहे. त्यात आता भर पडणार आहे ती नवीन नॉन एसी स्लीपर बसच्या सेवेची .महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीन मार्गांवरून नॉन एसी स्लीपर बसची सेवा आता सुरू होत आहे .
यासाठी एकूण बीएस-6 ह्या प्रकारच्या सहा बसेस जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत . बांदा – मुंबई , बांदा – बोरवली आणि बांदा- लातूर या तीन मार्गांवर या कमी प्रदूषण करणाऱ्या बसेस धावणार आहेत . या बसची निर्मिती एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे .या बस मध्ये एकूण 30 शयनयान यांची निर्मिती करण्यात आली आहे .
प्रत्येक प्रवाशाला फॅन , रीडिंग लाईट ,सामान ठेवण्यासाठी स्टॅन्ड याची व्यवस्था बसमध्ये करण्यात आली आहे . नॉन एसी स्लीपर बस असल्यामुळे या बसची सेवा रात्रीच्या प्रवासासाठी देण्यात येणार आहे . Now ST’s Suddha Non AC Sleeper Bus Service…
ML/KA/PGB
7 Oct 2023