भारतीय लष्करासाठी आता विशेष बुलेटप्रूफ जॅकेट

 भारतीय लष्करासाठी आता विशेष बुलेटप्रूफ जॅकेट

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून विविध अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाते. भारतीय सैन्यदलासाठी आता एक विशेष बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यात आले आहे. हे वजनाने सर्वात हलके असलेले हे बुलेटप्रूफ जॅकेट असून एके- ४७ टी गोळीही त्याला भेदू शकणार शकणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशातील कानपूर येथील ऑर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीने हे विशेष बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले आहे. त्याचे वजन हे फक्त साडेसहा किलो आहे आणि किंमत ८४ हजार रुपये इतकी आहे. हे जॅकेट खूप मजबूत असून वजनाने हलके असल्याने वापरायलाही हे सोपे आहे.तसेच यासोबत काही अनेक कप्पे बनवण्यात आले आहे.त्यात वेगवेगळ्या प्रकारचे सामान ठेवता येते.या विशेष बुलेटप्रूफ जॅकेटची पहिली खेप ही केरळ पोलिसांना देण्यात आली आहे.यासोबतच या जॅकेटच्या पुरवठ्याबाबत अनेक दलांमध्ये चर्चा सुरू आहे.लवकरच देशातील विविध दलांचे सैनिक हे स्पेशल बुलेटप्रूफ जॅकेट वापरताना दिसतील. कानपूर महानगरातील सहा संरक्षण युनिटमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जातात आणि ती सैन्यदलाला पुरवली जातात. या फॅक्टरीत शस्त्रास्त्रांसोबतच सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी अनेक उपकरणे बनवली आहेत.

OEF च्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या गडचिरोली पोलिसांनी 150 जॅकेट मागितले आहेत आणि DRDO ने 25 जॅकेट मागितले आहेत. ही जॅकेट लवकरच पाठवली जातील. हा बीआरजे तयार करण्यासाठी बराच वेळ लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, आम्ही प्रत्येक स्तरावर पूर्णपणे यशस्वी झालो याचा आम्हाला खूप आनंद आहे. जेव्हा सैनिक हे जाकीट घालतील तेव्हा ते पूर्णपणे सुरक्षित राहून शत्रूंचा सामना करू शकतील.

SL/ML/SL

28 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *