आता शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी, मागितली ५० लाखांची खंडणी
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो कॉल रायपूरवरून आल्याचं समोर आलं आहे. शाहरूख खानला धमकी देण्यामागे नेमकं कोण आहे? किंवा हा कुणाचा चेष्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.