तंतुवाद्य मार्केटिंगसाठी आता मॉलची उभारणी
सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किराणा घराण्याचे संस्थापक, जागतिक कीर्तीचे थोर गायक संगीतरत्न अब्दुल करीम खान यांचं स्मारक सभागृह मिरजेत उभारले जाणार आहे. तसेच मिरजेत तंतुवाद्यच्या मार्केटिंगसाठी मॉल उभा केला जाणार असून तंतुवाद्य कारागीरासाठी शासनामार्फत मानधन सुरू केले जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली.
संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील मिरज येथील अर्ध पुतळ्याचे सुशोभिकरणाचे उदघाटन किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कामगार मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.Now setting up a mall for stringed instrument marketing
आपल्या घराण्याचा अभिमान आहे
आपण किराणा घराण्यातील गायक आहोत यांचा मला अभिमान आहे, असे सांगून ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे पुढे म्हणाल्या,संगीत रत्न अब्दुल करीम खान ते पंडित भीमसेन जोशी यांच्या पर्यंतच्या अनेक कलाकारांनी किराणा घराण्याला श्रीमंत केलं. सामान्य श्रोत्यांच्या पर्यंत शास्त्रीय संगीत पोहोचवला आहे. सामान्य श्रोत्यांच्या मनामध्ये या शास्त्रीय संगीताबद्दल प्रेम आदर आणि गोडी निर्माण केली आहे.
संगीत रत्न अब्दुल करीम खान यांच्या सुरातील गोडवा, शांत सुरेल भावप्रधान अलाफी, शास्त्रीय संगीतात ख्याला प्रमाणेच इतर संगीत प्रकार लोकप्रिय होते. त्यांच्या मुळेच ठुमरीला मानाचे स्थान मिळालं, सामान्य श्रोत्यांना आवडणारे संगीत प्रकाराला जवळ करून अब्दुल करीम खान साहेबांनी ख्यालाला ही लोकप्रियता मिळवून दिली.
खरे तर संगीताचे दोनच प्रकार आहेत, कोणताही संगीत प्रकार चांगला किंवा वाईट असणे हे फक्त त्या कलाकारावर अवलंबून असते. आपण ऐकतो ते सगळेच शास्त्रीय संगीत ऐकण्यासारखे असते का. चित्रपट संगीतालाही दर्जा आहे हे सुद्धा ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, असे मतही प्रभा अत्रे यांनी यावेळी मांडले.
ML/KA/PGB
18 Feb. 2023