केंद्रांच्या माध्यमातून आता कोकणातील साकव नव्याने
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातील ओढ्या , नाल्यांवरचे साकव एकाच वेळी नव्याने बांधून काढण्यासाठी केंद्राकडून १६०० कोटींचा निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात काँक्रिट चे छोटे पूल बांधले जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
मूळ प्रश्न राजन साळवी यांनी उपस्थित केला होता. शेखर निकम, दीपक चव्हाण आदींनी उपप्रश्न विचारले, पूर्वी हे साकव जिल्हा परिषदमार्फत बांधले आणि दुरुस्त केले जात असत , मात्र निधी अभावी ते बहुतांश नादुरुस्त झाले आहेत. आता ते सगळेच एकत्रित नव्याने बांधून हा प्रश्नच निकाली काढण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केल्याचं मंत्री म्हणाले.
नवीन शिक्षक भरती
येत्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता.
ही भरती प्रक्रिया खासगी आणि सरकारी अशा सर्व शाळांसाठी केली जात आहे, त्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्या नेमून भरती प्रक्रिया राबवली जात आहे असं ते म्हणाले.Now Sakav in Konkan through the centers
ML/KA/PGB
16 Mar. 2023