आता कागदपत्रांशिवाय पीपीएफमधून काढता येतील ५ लाख रूपये

तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ फंडात पैसे जमा होत असतील तर ही बातमी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील ७.५ कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आपात्कालीन परिस्थितीत पीएफ काढण्यासाठी अनेक कागपत्रे जमा करावी लागत होती. मात्र, ही सुविधा सोपी करण्यासाठी ईपीएफओने नियमात बदल केले आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. जी आतापर्यंत १ लाख रुपये होती. म्हणजेच आता पीएफ खातेदार कोणत्याही कागदपत्रांशिवाय इतकी रक्कम काढू शकणार आहेत.