आता मशिदीत महिलांनाही प्रवेश
नवी दिल्ली,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या काळाबरोबर धर्मातील महिलांसाठी असलेली बंधने सैलावताना दिसत आहेत.ऑल इंडीया मुस्लिम पर्सलन लॉ बोर्डने मुस्लिम महिलांबाबत महत्त्वपूर्ण घेणारा एक मोठा निर्णय घेतला आहे.
काय आहे निर्णय
मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये प्रवेश करण्याची पूर्ण परवानगी असून त्या मशिदीत नमाज पठणही करू शकतात, असे प्रतिज्ञापत्र ऑल इंडीया मुस्लिम पर्सलन लॉ बोर्डने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केले. “नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात, मशिदीत नमाज पठणाचा अधिकार वापरायचा का नाही, हे सर्वस्वी महिलांनी ठरवायचे आहे,” असे देखील या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात फराह अन्वर शेख विरुद्ध केंद्र सरकार असा खटला सुरू आहे. मुस्लिम महिलांना मशिदीत नमाज पठणासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करणारा हा खटला आहे. वकील एम.आर, शमशाद हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात खटला चालवत आहेत.
SL/KA/SL
9 Feb. 2023