आता भाडेतत्वावरही मिळणार म्हाडाची घरे

 आता भाडेतत्वावरही मिळणार म्हाडाची घरे

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या पाच वर्षांत मुंबईत 2.50 लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. परवडणाऱ्या घरांच्या किमती 30 टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णय देखील म्हाडा घेण्याची शक्यता आहे. यासह म्हाडाची घरे भाडे तत्वार देण्याचा मोठा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा सर्वसामान्यांना परवडतील असा दरात घरं उपलब्ध करुन देते. म्हाडाच्या लॉटरीत अनेक जण आपले नशिब आजमवतात. अनेकांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या लॉटरीमुळे पूर्ण होते. घरांच्या विक्रीसह आता मुंबईत म्हाडची घरं भाडे तत्वावर मिळणार आहेत. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

विविध कारणांमुळे तसेच कादपत्रांची पूर्तता न झाल्यास अनेकांना म्हाडाचे घरं खरेदी करता येत नाही. मुंबईत स्वत:चे घर नसलेले तसेच शिक्षणासाठी आणि कामानिमित्ताने मुंबईत राहणाऱ्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागते. अशा लोकांना म्हाडाच्या एका निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत भाड्याने घरे उपल्बध करुन देण्याची तयारी म्हाडा करत आहे. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना म्हाडाची घरं भाड्याने दिली जाणार आहेत.

केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड करण्यात आली आहे. या भागात 2030 पर्यंत म्हणजेच पुढील पाच वर्षांमध्ये या भागात सुमारे 30 लाखांहून अधिक घरांची उभारणी करण्याचा मानस बाळगण्यात आला आहे. यातील सुमारे 8 लाख घरांच्या उभारणीची जबाबदारी म्हाडानं घेतली आहे.

SL/ML/SL

16 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *