आता जोगेंद्र कवाडे बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आज जाहीर केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज ही घोषणा केली.
बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संयुक्त पणे पत्रकार परिषद आज मुंबईत बाळासाहेब भवन, मंत्रालयासमोर येथे घेतली
आणि दोन्ही पक्ष युती करीत असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी बाळासाहेबांची शिवासेना या पक्षाचे वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, दादर खासदार राहुल शेवाळे , मंत्री गुलाबराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/SL
4 Jan. 2023