आता ISRO ची सूर्याकडे झेप, ‘मिशन आदित्य’ जाहीर

 आता ISRO ची सूर्याकडे झेप, ‘मिशन आदित्य’ जाहीर

छायाचित्र प्रातिनिधिक

श्रीहरीकोटा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने पाठवलेले चांद्रयान-३ येत्या काही दिवसांतच चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-३च्या यशस्वी वाटचालीनंतर ISRO ने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपग्रहाचा फोटो जारी केला आहे. हा उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी सुरु केलेल्या या मिशनला आदित्य-एल-१ असे नावद देण्यात आले आहे. सुर्य आपल्या सुर्यमालेतील सर्वात जवळील आणि सर्वात मोठा ऑब्जेक्ट आहे. सूर्याचं अंदाजे वय ४.५ बिलियन वर्ष आहे. सुर्य हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला वायूंचा गोळा आहे.

२३ ऑगस्टला चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचेल असा अंदाज लावला जातोय. त्यानंतर काही आठवड्यानंतर मिशन सूर्य सुरु करण्यात येईल. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था १५०० किलोचा रोबोटिक उपग्रह लॉंच करणार आहे. यामाध्यामातून सुर्याचे निरीक्षण करण्यात येईल. यासाठी ४०० कोटींमध्ये सौर वेधशाळा तयार करण्यात आली आहे. हा उपग्रह सुर्यावरील उष्णता लहरी आणि सूर्यावर येणाऱ्या वादळांवर नजर ठेवणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की ‘आदित्य एल-१’सूर्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. हा उपग्रह आपल्याला सूर्याच्या विद्युत चुंबकीय प्रभावांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची सुचना आधीचं देईल. जर वेळेच्या आधी सुचना मिळाली तर उपग्रह, बाकीचे विद्युत साधनांना नुकसान होण्यापासून वाचवले जाऊ शकते.अंतराळात भारताचे पन्नासपेक्षा जास्त उपग्रह आहेत. ज्याची किंमत ५०,००० कोटींपेक्षा जास्त आहे, आदित्य एल-१’ हे मिशन या उपग्रहांना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

SL/KA/SL
14 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *