आता इंग्लंडमध्येही अनधिकृत भारतीयांवर कारवाई सुरू

इंग्लंड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणामुळे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची कठोर पद्धतीने घरवासपी सुरु झाली आहे. हजारो भारतीयांना अमेरिका घरचा रस्ता दाखवत आहे. त्यानंतर आता इंग्लंडनेही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची कारवाई सुरु केली आहे. इंग्लंडमधील अनधिकृत भारतीयांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या व्यवसायांवर धाडी टाकण्यात येत आहेत. भारतीयांची हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, ब्युटी पार्लर व कारवॉश सारख्या व्यवसायात अनेक अनधिकृत भारतीय राहतात असा अंदाज आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गृहविभागाने धाडी टाकून त्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्याभरात 4 चार्टर्ड विमानांच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना परत पाठविण्यात आले. ब्रिटनमध्ये भारतीयांकडून होत असलेल्या उल्लंघनाच्या विरोधात संसदेतही चर्चा झाली आहे.

इंग्लंडच्या गृह विभागाच्या मंत्री अवेट कूपर यांनी म्हटले आहे की, “आमच्या देशाच्या इमिग्रेशन कायद्यांचा योग्य तो सन्मान राखलाच गेला पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे अनधिकृतरित्या येणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अनेकजण छोट्या बोटीतून खाडी पार करून देशात येतात. यात त्यांच्या जीवितालाही धोका असून, आमच्या देशाला व इमिग्रेशन पद्धतीलाही मोठा धोका आहे.जानेवारीमध्ये अशा प्रकारच्या आस्थापनांवर विक्रमी धाडी टाकल्या आहेत. या महिन्यात 828 आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या असून, गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 48 टक्के अधिक आहे. गेल्या महिन्यात प्रामुख्याने रेस्टॉरण्ट, खाद्यविक्रेते, कॅफे, पेयपान केंद्र व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या दरम्यान 609 जणांना अटक करण्यात आली. हंबरसाईड भागातील एका हॉटेलात मारलेल्या धाडीत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.”

SL/ML/SL

12 Feb, 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *