आता या जिल्ह्यातही सोन्याचे साठे …

 आता या जिल्ह्यातही सोन्याचे साठे …

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  चंद्रपूर,भंडारा नंतर आता नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात सोने खनिज साठा असल्याचे सिद्ध झाले असून या संदर्भात नागपुरातील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केंद्र आणि राज्य सरकारला आपला विस्तृत अहवाल दिला आहे .Now gold reserves in this district too…

नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली गोल्ड ओर असल्याचे सांगितले आहे. ही माहिती भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे मात्र,भूगर्भातील सोन्याचे प्रमाण फार कमी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सोन्याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठे असल्याचंही सर्वेक्षणात पुढं आलं आहे. नागपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे आढळले असले तर ते कमी प्रमाणात असल्याने अद्याप खाणींसाठी लिलाव झाला नाही. त्यामुळं हा सोनेरी साठा महाराष्ट्राला झळाळी आणणार की तसाच जमिनीखाली राहणार असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.

ML/KA/PGB
7 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *