आता ‘डाबर’ विकणार मसाले

 आता ‘डाबर’ विकणार मसाले

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दंतमंजनासारख्या रोजच्या वापरातील वस्तू पासून आयुर्वेदीक औषधांपर्यंत देशातील मोठे मार्केट व्यापणारी डाबर कंपनी आता मसाला मार्केटमध्ये पदार्पण करत आहे. भारतातील लोकप्रिय मसाला ब्रँड बादशाह मसाल्यात डाबरने मोठा हिस्सा  विकत घेतला आहे. आता बादशाह मसाला कंपनीत डाबरचा 51 टक्के वाटा आहे.

डाबर इंडियाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार , 2 जानेवारी 2023 पासून बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आती डाबरची उपकंपनी असेल. डाबरमुळे कंपनीला भविष्यात मोठी झेप घेता येईल. या दोन्ही कंपन्या एकमेकींना पुरक आहेत, असे बादशाह मसाल्याचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत झावेरी यांनी म्हटले आहे.

दळलेल्या मसाल्यात बादशाह मसाला गृहिणी, हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा मालकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ब्रँड आहे.. बादशाह, मसाला उत्पादन, विपणन आणि निर्यात करतो. यामध्ये कंपनी सिंगल टाईप मसाले, मसाला ब्लेंड आणि सीजनिंग इत्यादी कामे करते.  आता आयुर्वेदिक औषधांचा राजा असलेला डाबर आता मसाल्यांचा बादशाह होणार आहे.

SL/KA/SL

4 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *