वैद्यकीय प्रयोगशाळांसाठी आता विशेष कार्यप्रणाली

 वैद्यकीय प्रयोगशाळांसाठी आता विशेष कार्यप्रणाली

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांसाठी येत्या तीन महिन्यांमध्ये विशेष कार्यप्रणाली तयार करून त्यानंतर निश्चित धोरण तयार करण्यात येईल असं आज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. ही विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

सांगली इथले वैद्य योगेश माहिमकर यांनी मधुमेहग्रस्त रुग्णाच्या रक्ताचे नमुने हे चार स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये पाठवले मात्र या चारही प्रयोगशाळांच्या अहवालामध्ये तफावत आढळून आल्याचा व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता,या अनुषंगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

माहिमकर यांनी जनजागृतीच्या उद्देशाने हा व्हिडीओ केला होता त्यांनी कोणत्याही प्रयोगशाळे
विरोधात तक्रार केली नाही असं सावंत नमूद केलं मात्र या वैद्य माहिमकर यांनी अफवा पसरवत दिशाभूल केल्याचं सांगत त्यांच्याविरोधात सायबर गुन्हा दाखक करण्याचे निर्देश उपसभापतींनी दिली त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात येईल, असं तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितलं.Now a special operating system for medical laboratories

ML/KA/PGB
26 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *