राज्यात वाळूसाठी आता नवे धोरण
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वाळू चोरी , वाहतूक , बेकायदा उत्खनन यावर आळा घालण्यासाठी हे अधिवेशन संपेपर्यंत नवीन सर्वंकष वाळू धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली.
यासंदर्भातील प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता, त्यावर अशोक चव्हाण , राजेश टोपे , भास्कर जाधव आदींनी उपप्रश्र्न विचारले होते.
हे धोरण सर्वसामान्य जनतेला वाळू परवडेल असे असेल , सरकारी योजनांसाठी लागणाऱ्या वाळूचा विचार यात केला जाईल, दगड खाणी उत्खनन चा ही यात विचार असेल , वाळू वाहून नेणाऱ्या मोठ्या हायवा गाड्यांना पूर्ण बंदी घातली जाईल असं विखे पाटील म्हणाले.मूठभर लोकांच्या फायद्यासाठी सामान्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ही मंत्री म्हणाले.Now a new policy for sand in the state
दगडखाण उत्खनन बंद
अंजनवेल तालुका गुहागर येथील खाडीत जेटीसाठी संरक्षक भिंत बंध होत असलेलं दगड खाणी चे उत्खनन तातडीने बंद केले जाईल , या कंपनीने पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले असल्यास गुन्हा दाखल केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली, हा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता. त्याला आशीष शेलार यांनी उप प्रश्न विचारले होते.
या दगड खाणी उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या उत्खननात नुकसान झालेल्या घरं, विहिरी आणि रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण करून मदत दिली जाईल असं ही मंत्री म्हणाले.
ML/KA/PGB
13 Mar. 2023