रस्ते अपघात रोखण्यासाठी आता अत्याधुनिक यंत्रणा

नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वाहनांचे सतत वाढणारे अपघात आणि होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यभरात वाहन परवाना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
याबाबतचा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावर वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे आदींनी उपप्रश्र्न विचारले. १७ ठिकाणी असे ट्रॅक तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, याशिवाय २३ ठिकाणी आधुनिक वाहन फिटनेस सेंटर्स उभारण्यात येणार आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. वाहने रस्त्यावरून जाताना लेन ची शिस्त पाळतात का याची खात्री केली जाईल असं संबधित खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.
प्राणी संग्रहालयाची चौकशी
पिंपरी चिंचवड येथील कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे काम रखडल्याची चौकशी प्रधान सचिव, नगरविकास यांचे मार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात केली. मूळ प्रश्न अश्विनी जगताप यांनी उपस्थित केला होता.
२०१५ सालापासून हे संग्रहालय जनतेसाठी बंद आहे, त्यातील ३६ प्राण्यांचे मृत्यू झाले, करायची सर्व कामे रखडली आहेत या सगळ्यांची चौकशी यात केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, योगेश सागर यांनी यावर उपप्रश्न विचारले.
ML/KA/SL
12 Dec. 2023