राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नोवेल साळवे यांचे मुंबई आझाद मैदान येथे धरणा आंदोलन सुरूच
मुंबई, दि ८: प्रतिनिधी माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अजून मोकाट असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारींवर बडतर्फाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र सरकार हिवाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवताडे यांना पोलीस खात्यातून बरखास्त केले जात नाही तोपर्यंत मी माझे धरणा आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका नोवेल साळवे यांनी घेतली आहे.KK/ML/MS