आम्हाला न्याय द्या अन्यथा आत्मदहन करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे
मुंबई, दि ४
राज्य सरकार आणि पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे माझ्यावर झालेला हल्ल्याचे आरोपी अजूनही मोकाट आहेत त्यांना त्वरित अटक करा अन्यथा मी आंदोलन करून आत्मदहन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव श्री. नोवेल साळवे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
दिनांक 9/6/2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात सेंट्रल पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका वृद्ध व्यक्तीला काही लोक मिळून मारहाण करीत होते त्या वृद्ध व्यक्तीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला मी गेलो असताना माझ्यावर उल्हासनगर येथील विनोद ठाकूर यांच्या गुंड सहकार्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात माझा ब्लडप्रेशर शूटआउट झाल्यामुळे मला कार्डिएक अटेक आला त्यामुळे डॉक्टरांना माझा ओपन हार्ट सर्जरी करावे लागले मी तीन दिवस वेंटिलेटर वर होतो आणि माझा जीव जाता जाता वाचला, माझ्यावर हल्ला झालेले दिवशी माझ्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस स्टेशन ला धाव घेतली व घडलेल्या घटना ची सविस्तर माहिती दिली आणि दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली परंतु त्यावेळेस पोलीस अधिकारींनी फक्त एन सी नोंदवले. पोलिसांनी माझ्या बायको ला सांगितले की आम्ही हॉस्पिटल मध्ये येवून गुन्हा दाखल करण्याचे बाकी प्रक्रिया तिथेच पूर्ण करू, परंतु मी 24 दिवस हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत असताना येवढ्या दिवसात एकही पोलिसांनी येवून माझी विचारपुस केली नाही. पोलिसांनी माझ्या केस मध्ये निष्काळजीपणा करण्याचा एकच कारण होता की माझ्या केस मधून दोषींना वाचवण्यासाठी सेंट्रल पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आवताडे साहेब व या केस मध्ये त्यांना सहकार्य करणारे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात दोषी असलेल्या लोकांकडून पैशांचा देवाणघेवाण केलेले आहे, त्याचमुळे येवढ्या गंभीर घटना घडलेला असताना पोलिसांनो माझा जबाब न नोंदविता माझ्या केस ला दफ्तरी फाईल करून टाकले. मला न्याय मिळावे म्हणून मी हॉस्पिटल मधून घरी आल्यावर दिनांक 21/7/2025 रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांना, ठाणे पोलीस आयुक्त साहेबांना व आमच्या पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे साहेबांना व आता अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांना निवेदन देऊन दोषीवर गुन्हा नोंदवण्यासाठी विनंती केली होती, परंतु माझ्या त्या निवेदनावर कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे
मी आठ डिसेंबर पासून मुंबई आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करणार आहे. दिनांक 8/12/2025 रोजी महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवशी पासून आम्ही आझाद मैदान येथे आमचे धरणा आंदोलन सुरू करणार आहोत याची नोंद राज्य सरकारने घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नोवेल साळवे यांनी या ठिकाणी दिली.
श्री. नोवेल साळवे हे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाचे एक मोठे राजकीय नेते आहेत, त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला चा महाराष्ट्रातील संपूर्ण ख्रिस्ती समाज निषेध करतो व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बिशप शांतकुमार शेळके यांनी यावेळी केली.यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ऑलिव्हर डिसूजा, रमेश गंगावणे, निशा साळवे उपस्थित होते. KK/ML/MS