नोव्हाक जोकोविच 10 व्यांदा जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशिप
मेलबर्न,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्बियन स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावत अनेक विक्रम मोडले. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र त्यांची कमी भरून काढून त्याने या वर्षी विक्रमी खेळी करून चाहत्यांचे समाधान केले.
या विजेतेपदासह ३५ वर्षीय जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. दोघांच्या खात्यात आता २२-२२ जेतेपदे आहेत. निवृत्त रॉजर फेडरर २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जोकोविचच्या २२ विजेतेपदांमध्ये १० ऑस्ट्रेलियन ओपन, २ फ्रेंच ओपन, ७ विम्बल्डन आणि ३ यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
SL/KA/SL
29 Jan. 2023