गणवेश नसताना सफाई कर्मचारी परिधान कसा करणार?

 गणवेश नसताना सफाई कर्मचारी परिधान कसा करणार?

मुंबई, दि 29 करदात्या मतदात्या सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट सिटी चे स्वप्न दाखवणारया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील
सफाई कर्मचारी वर्ग यांना(आरोग्य खाते)विभागाच्या वतीने एक वर्षा आड-गणवेश गंबुट रेनकोट त्यांच्या वतीने कामगारांना दिले जातात
महापालिकेमधील सफाई कर्मचाऱ्यांना चक्क-०२/०३-वर्षापासून या वस्तू महानगरपालिकेकडून देण्यात आलेले नाही आहे
या अगोदर महानगरपालिकेकडून सर्व चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांना चपला व साबण दिले जात होते आत्ता या वस्तू दिले जात नाही व महानगरपालिकेकडून परिपत्रक काढतात की चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आपले गणवेश परिधान करून कामावर हजर राहावे जेव्हा गणवेश दिले जात नाही तर सफाई कर्मचारी तो परिधान करणार कसा? असा सवाल कर्मचारी विचारत आहेत
महापालिका प्रशासक आयुक्तांनी संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा करून चतुर्थ श्रेणी कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेतच गणवेश गंबूट चप्पल साबण छत्र्या वाटप करावे व नियमाचे पालन करायला सांगावे अशी मागणी होत आहे

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *