या देशात गेल्या तीन महिन्यात जन्मले नाही एकही बाळ
रोम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील पर्यटकांचा आवडता असलेला इटली हा देश सध्या एका गंभीर समस्येला सामोरा जात आहे. इटलीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. ही समस्या इतकी मोठी आहे की इटलीचे पंतप्रधान या प्रश्नाकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहत आहेत.
नॅशनल स्टॅटि्क्स ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इटलीमध्ये जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंतच्या काळात जितक्या बाळांचा जन्म झाला तो आकडा जानेवारी 2022 ते जून 2022 च्या तुलनेत 3500 ने कमी आहे. मागील वर्षभरात इथे दर 7 मुलांच्या जन्मामागे 12 नागरिकांचा जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला.
इंग्रजी न्यूज वेबसाईट मीडियमने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीने नुकताच एक नवा विश्वविक्रम केला आहे. मात्र, या विश्वविक्रमामुळे आनंद वाटण्यासारखं काही नाही, तर ही एक जागतिक समस्या आहे. गेल्या तीन महिन्यांत इटलीमध्ये एकाही बाळाचा जन्म झालेला नाही. इटलीत जन्म दर घटला आहे.
जन्मदर एवढा कमी का झाले याचे कारण शोधणाऱ्या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, याचं मुख्य कारण म्हणजे 15 ते 49 वयोगटातील महिलांची कमतरता. म्हणजेच, इटलीमध्ये प्रजननक्षम वयाच्या महिलांची कमतरता आहे, त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. 2021 च्या तुलनेत 2023 मध्ये अशा महिलांची संख्या फार कमी झाली आहे.
SL/KA/SL
30 Aug. 2023