या नॉर्वेजियन लेखक साहित्याचा नोबेल पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखक जॉन यांनी ‘फॉस्से मिनिमिलजम’ या नावाने ओळखली जाणारी स्वतःची लेखन पद्धती विकसित केली आहे. नाविन्यपूर्ण नाटक लेखन केल्याबद्दल, तसंच आपल्या लिखाणातून कित्येक उपेक्षितांना आवाज मिळवून दिल्याबद्दल जॉन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. उपहासात्मक शैलीतील लिखाण एका वेगळ्या शैलीत लिहिलं. त्यांची हीच शैली पुढे ‘फॉस मिनिमलिझम’ या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांची दुसरी कांदबरी ‘स्टेंज्ड गिटार’ जी 1985 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांच्या या शैलीची प्रकर्षाने जाणीव होते.
फॉस्से यांच्या लिखाणात आपल्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या घटनांचं चित्रण सादर करण्यात आलं आहे. त्यांच्या लिखाणातून मजबूत भाषिक आणि स्थानिक संबंध दिसून येतात. हतबलता, भीती, नैराश्य अशा शक्तिशाली मानवी भावना अगदी सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचं कौशल्य फॉस्से यांच्या लिखाणात दिसून येतं. असं मत यावेळी ज्युरींनी व्यक्त केलं.
फॉस्से यांचा जन्म 1959 मध्ये नॉर्वे झाला.त्यांनी त्यांचे बहुतेक लिखाण हे नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये लिहिलेले आहे.त्यांच्या लिखाणामध्ये अनेक कथा नाटके, कादंबरी, कविता संग्रह, निबंध, मुलांची पुस्तके आणि अनुवाद यांचा समावेश आहे.
SL/KA/SL
5 Oct. 2023