नेपाळसह उत्तर भारत भूकंपाने हादरला
नवी दिल्ली,९ नोव्हेंबर : काल रात्री १.५७ वाजता भारत, चीन आणि नेपाळमध्ये (India Nepal Earthquake) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळच्या डोटी येथे घर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये बुधवारी सकाळी ६.२७ वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी होती.जाणवले. मागील २४ तासांमध्ये दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
SL/KA/SL
9 Nov. 2022