भारतातही झाले नॉर्दर्न आणि सदर्न लाइट्सची अद्भूत रोषणाई दर्शन

लडाख, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन दिवसांत सौरस्फोटामुळे भूचुंबकीय वादळ तयार झाले आणि म्हणूनच अचानक जगाच्या अनेक भागांमध्ये आकाशात रंगांचs तरंग दिसू लागले. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने वादळाचे स्वरूप तीव्र असल्याचे म्हटले आणि पुढील दिवसांत आणखी वादळे ग्रहावर धडकू शकतात असेही सांगण्यात आले. दरम्यान या खगोलिय घटनेमुळे नॉर्दर्न लाइट्स आणि सदर्न लाइट्स हा निसर्गाचा अद्भुत नमुना जगभरातील लोकांना पहायला मिळाला. नॉर्दर्न लाइट्सला अरोरा बोरेलिस, तर सदर्न लाइट्सला अरोरा ऑस्ट्रेलिस म्हणूनही संबोधले जाते. सामान्यतः अरोरा बोरेलिस स्वीडन, नॉर्वे, फीनलँडसारख्या देशात पाहायला मिळतात. परंतु, पृथ्वीवर धडकलेल्या सौर वादळामुळे शनिवारी पहाटे लडाखमधील हानले गावातही आकाशात रंगीबेरंगी रोषणाईचे दर्शन झाले.
अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील इतर भागातही नॉर्दर्न लाइट्सचे दर्शन घडले. तर, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये सदर्न लाइट्स म्हणजेच अरोरा ऑस्ट्रेलिसचे दर्शन घडलेअरोरा मुळात नैसर्गिक प्रकाश आहे. निसर्गातील बदलामुळे आकाशात निळ्या, लाल, पिवळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांमध्ये प्रकाश किरण दिसून येतात, यालाच अरोरा बोरेलिस म्हणतात. ही प्रकाश किरणे प्रामुख्याने संपूर्ण वर्षभर उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दोन्ही ध्रुवांजवळ दिसतात. परंतु, काहीवेळा ही प्रकाश किरणे जगाच्या इतर भागातही दिसून येतात. असाच काहीसा अनुभव लडाखच्या हानले गावातही आला.
सौर वाऱ्यातील हे कण ऑक्सिजनबरोबर मिसळले जातात, तेव्हा आकाशात हिरव्या रंगाचे तरंग दिसतात आणि हे कण नायट्रोजनबरोबर मिसळल्यास निळ्या आणि जांभळ्या रंगाचे तरंग दिसतात.हे लाइट्स जमिनीपासून साधारणतः ८० ते ५०० किमी उंचीवर असतात. भूचुंबकीय वादळे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS), रेडिओ आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन्स, फ्लाइट ऑपरेशन्स, पॉवर ग्रिड्स आणि स्पेस एक्सप्लोरेशनसारख्या अंतराळातील प्रोग्राम्सवरदेखील परिणाम करू शकतात.
SL/ML/SL
12 May 2024