स्थानिक स्वराज्य संस्थांना
नोंदणी शुल्काची रक्कम त्वरित…

मुंबई दि ४ — राज्यातील मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्शाचा एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल , यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडून त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना रणधीर सावरकर यांनी उपस्थित केली होती.
सध्या राज्यातील नगरपालिकांचे ९३० कोटी, महानगरपालिकांचे ४,३२९ कोटी तर जिल्हा परिषदांचे २,५९८ कोटी इतकी रक्कम देणे बाकी आहे, ही रक्कम बरेच दिवस त्यांना देण्यात आलेली नाही, मात्र आता ही रक्कम दस्तऐवज नोंदणी होताच त्यांना द्यायची एक टक्का इतकी रक्कम त्यांना त्वरित देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी लागेल, त्यासाठी वित्तमंत्री आणि मग मुख्यमंत्री यांच्याकडे चर्चा करून ते करण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. ML/ML/MS