नोबेल पारितोषिक विजेती मलाला हिचे नवऱ्याबाबतचे हे ट्वीट आहे चर्चेत
मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरवर ट्विट करून बरेच सेलिब्रिटी ट्रेंडिंग मध्ये असतात. अशातच नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसाफझाई ही सुद्धा या यादीत समाविष्ट झाली आहे. मलाला सध्या तिच्या एका अतरंगी ट्वीटमुळे ट्वीटरवर ट्रेंडिंगला आली आहे. तिने आपल्या नवऱ्याच्या पायमोजावर एक ट्वीट केलं आहे. त्यावरून तिला अनेक नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. तर तिचं ट्वीटही अनेकांकडून शेअर केलं जात असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलालाने ट्वीटर वर असे ट्वीट केले आहे की ; “घरातील सोफ्यावर मला घाण पायमोजे दिसले. मी मलिक असरला विचारले की, हे मोजे तुझे आहेत का? तर तो म्हणाला ते पायमोजे घाण आहेत आणि मी त्याला दूर ठेवू शकलो असतो. त्यानंतर मी ते पायमोजे घेतले आणि कचराकुंडीमध्ये टाकले.” त्यानंतर तिला अनेकांकडून ट्रोल केलं जात आहे.
ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. १० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून दिले गेले. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती आहे.मलाला युसुफझाईने नोव्हेंबर २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापक असेर मलिक यांच्याशी लग्न केले आहे.
सध्या तिला या ट्वीटवरून अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्याचबरोबर या ट्वीटवर अनेकांनी आपल्या मजेशीर कमेंट टाकल्या आहेत. या ट्वीटला आत्तापर्यंत ९ हजार युजर्सने लाईक केलं असून दशलक्ष युजर्सने पाहिलं आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
TM/KA/SL
6 Feb. 2023