दक्षिण कोरियाच्या लेखिकेला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर

 दक्षिण कोरियाच्या लेखिकेला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर

स्वीडन, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या हान कांग या लेखिकेला जाहीर झाला आहे. जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत सादर केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. नोबेल समितीने हान कांग यांच्या ‘ग्रीक लेसन’ या कादंबरीवर विशेष चर्चा केली आहे. आयुष्यातील संकटांमुळे आवाज गमावलेल्या मुलीची ही कथा आहे.हान कांग यांनी 1993 मध्ये कविता लिहून करिअरची सुरुवात केली. 1995 मध्ये त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली.

नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या हान कांग या अठराव्या आणि पहिल्या कोरियन महिला आहेत. यापूर्वी 2016 मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी त्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिकही मिळाले होते. या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.

नोबेल समितीवर निवडक देशांतील नागरिकांना बक्षिसे दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे या वेळी समितीने व्याप्ती वाढवत दक्षिण कोरियाच्या एका लेखकाला पुरस्कार दिला आहे. हे नोबेल पारितोषिक वितरण 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. विजेत्यांना 8.90 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जात आहे.

SL/ML/SL

10 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *