अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर
स्वीडन, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. विजेत्यांमध्ये तुर्की-अमेरिकन डॅरेन एसेमोग्लू, ब्रिटिश-अमेरिकन सायमन जॉन्सन आणि ब्रिटन जेम्स ए. रॉबिन्सन यांचा समावेश आहे. विविध राजकीय संस्थांची निर्मिती आणि त्याचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आ आहे. या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी वर्षानुवर्षे प्रगती करूनही गरीब देशांचा श्रीमंत देशांसारखा विकास कसा होऊ शकला नाही, हे सांगितले आहे.
भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांतातील योगदानासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विविध विषयांसाठीचे नोबेल पुरस्कार २०२४
- वैद्यकशास्त्र- व्हिक्टर अॅब्रोस आणि गॅरी रुवकुन (मायक्रोआरएनएच्या शोधासाठी)
- साहित्य – हान कांन, दक्षिण कोरियातील लेखिका (काव्यात्मक गद्यासाठी)
- शांतता- जपानमधील निहोन हिडानक्यो या संघटनेला (आण्विक शस्त्रांविरुद्ध दिर्घकाळ मोहिम चालवल्याबद्दल)
- भौतिकशास्त्र- जेफ्री हिंटन, जॉन हॉपफिल्ड
- रसायनशास्त्र- डेमिस हसाबिस, डेव्हिड बेकर,जॉन जम्पर
- अर्थशास्त्र- डॅरोन ऐममोग्लू, सायमन जॉनसन आणि जेम्स रॉबिन्सन
SL/ML/ML
14 Oct. 2024