नोबेल शांतता पुरस्कार २०२३ जाहीर

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. 51 वर्षीय नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या 30 वर्षात नर्गिस मोहम्मदी यांना त्यांचे लेखन आणि अन्यायाविरोधात हालचालींबद्दल सरकारने अनेकदा शिक्षा केली आहे. माहितीनुसार, न्यायव्यवस्थेने मोहम्मदींना पाच वेळा दोषी ठरवले आहे आणि 13 वेळा अटक केली आहे.

यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते, त्यापैकी 259 व्यक्ती आणि 92 संस्था होत्या. नोबेल पुरस्काराच्या मानांकनाच्या यादीत वकील कोहसार, नर्गेस मोहम्मदी फाऊंडेशन, अफगाण महिला कार्यकर्त्या मेहबूबा सेराज, इराणी हक्क प्रचारक नर्गेस मोहम्मद, यांची नावे समाविष्ट होती. 1901 मध्ये फ्रेडरिक पासी आणि हेन्री ड्युनांट यांना पहिल्यांदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. गेल्या वर्षी 2022 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता.

ज्या व्यक्ती किंवा संस्था आपल्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात, त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
SL/KA/SL
6 Oct. 2023


mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *