Nobel 2025 –अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

 Nobel 2025 –अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम, दि. 13 : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज 2025 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा पुरस्कार जोएल मोकीर (अमेरिका), फिलिप एघियन (युनायटेड किंगडम) आणि पीटर हॉविट (अमेरिका) यांना प्रदान करण्यात आला आहे. या संशोधनामुळे सरकार, उद्योग आणि शिक्षणसंस्था नवोन्मेषाला चालना देण्यासाठी धोरणे आखू शकतात. आर्थिक विकासासाठी नवोन्मेष किती महत्त्वाचा आहे हे या संशोधनाने अधोरेखित केले आहे.

या तिघांनी “नवोन्मेष प्रेरित आर्थिक विकास” या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांनी क्रिएटिव डिस्ट्रक्शन म्हणजेच सर्जनशील विनाश या संकल्पनेद्वारे स्पष्ट केले की जुनी आर्थिक रचना नष्ट होऊन नवीन तंत्रज्ञान आणि कल्पकतेमुळे अर्थव्यवस्था अधिक सक्षम होते.

संशोधनाची वैशिष्ट्ये:

जोएल मोकीर यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि त्याचा आर्थिक विकासावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.

फिलिप एघियन आणि पीटर हॉविट यांनी आर्थिक सिद्धांतात नवोन्मेषाचे स्थान स्पष्ट करत “एंडोजेनस ग्रोथ थिअरी” विकसित केली, जी आर्थिक धोरणांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

या नोबेल पुरस्काराची एकूण रक्कम तीन भागांत विभागली गेली असून त्यातील अर्धा भाग जोएल मोकीर यांना देण्यात आला आहे, तर उर्वरित रक्कम एघियन आणि हॉविट यांच्यात विभागली गेली आहे.

SL/ML/SL 13 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *