कोणत्याही जागतिक नेत्याची मध्यस्ती नाही, ऑपरेशन सिंदूर सुरूच…

 कोणत्याही जागतिक नेत्याची मध्यस्ती नाही, ऑपरेशन सिंदूर सुरूच…

नवी दिल्ली, दि. २९ : जगातील कोणत्याही देशाच्या प्रमुखाने ऑपरेशन सिंदूर प्रकरणी मध्यस्ती केली नाही असे निःसंदिग्धपणे स्पष्ट करत आत्मनिर्भर भारत या आमच्या भूमिकेमुळेच आज आपल्या सैन्यदलाने अत्युच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानला गुढघ्यावर आणले आहे. हतबल झालेल्या पाकिस्तानने विनंती केल्यावरूनच ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करत राहील तोवर ते सुरूच राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिली.

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला, पाकिस्तानसोबत युद्धबंदी आणि ऑपरेशन सिंदूर यावरील विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत आहे, परंतु काँग्रेस आता आपल्या मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून असल्याचं दिसत आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरलं. ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीलाच भारताने युद्धबंदी केली, असा आरोप त्यांनी केला होता. सरकारची लढण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुम्ही फक्त 30 मिनिटांत आत्मसमर्पण केले, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. राहुल आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरं देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘वाह रे, बयान बहादुरों… तुम्हाला फक्त निषेध करण्यासाठी बहाणा हवा आहे.’

ऑपरेशन सिंदूर सुरु आहे. जर पाकिस्तान कोणत्याही प्रकारच्या धाडसाची कल्पना करत असेल तर त्याला योग्य उत्तर मिळेल, असं मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी देशाला आश्वासन दिले की भारत आता आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि स्वावलंबनाच्या मंत्राने वेगाने पुढे जात आहे.

तसेच, पंतप्रधान लोकसभेत काँग्रेसवर टीका करत म्हणाले की, ‘आजचा भारत स्वावलंबी होत आहे, परंतु काँग्रेसला त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी पाकिस्तानमधून मुद्दे आयात करावे लागत आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आता पाकिस्तानच्या नॅरेटिव्हचे प्रवक्ते बनले आहेत.


सैन्याचे मनोबल कमी करण्याचे आणि जनतेमध्ये अविश्वास पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दुर्दैवाने, काँग्रेस याचा एक भाग बनली आहे, असंही मोदी म्हणाले. आज दहशतवादी रडत आहेत. त्यांची अवस्था पाहून येथील काही लोक रडत आहेत. भारतीय सैन्याच्या कामगिरीने काही लोक दुःखी आहेत हे दुर्दैवी आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *