आता G-20 नाही, तर G-21

 आता G-20 नाही, तर G-21

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G-20 ही जागतिक संघटना आता G-21 म्हणून ओळखली जाणार आहे. दिल्लीमध्ये सध्या जी-20 परिषदेची मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीची सुरुवात करतानाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. यानंतर आफ्रिकन संघाचे अध्यक्ष अझाली असोउमानी यांचं सर्वांनी स्वागत केलं.

आफ्रिकन महासंघाला जी-20 देशांचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पंतप्रधानांनी सर्व सदस्य देशांसमोर प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांची मान्यता मिळाल्यानंतर PM मोदींनी आपल्याजवळील ‘गॅवल’ तीन वेळा वाजवून आफ्रिकन संघाच्या अध्यक्षांना पुढे आमंत्रित केले.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर परराष्ट्र मंंत्री जयशंकर यांनी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना आपल्या नवीन स्थानापर्यंत पोहोचवले. याठिकाणी पंतप्रधान मोदींनी मिठी मारुन त्यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. टाळ्यांच्या कडकडाटात अझाली असोउमानी हे जी-20 टेबलवरील आपल्या जागेवर स्थानापन्न झाले.

आफ्रिकन महासंघामध्ये एकूण 55 देशांचा सहभाग आहे. यांची एकूण लोकसंख्या ही 1.3 अब्ज एवढी आहे. ही संख्या 2050 सालापर्यंत दुप्पट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या समूहाला जी-20चं स्थायी सदस्यत्व देण्यात यावं अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने आता ही मागणी पूर्ण झाली आहे.

SL/KA/SL

9 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *