या शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल धोरण

इंदौर, दि. ३० : सुरक्षित प्रवासासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे आवश्यक असतानाही अनेकदा ते टाळण्याकडे लोकांचा कल असतो. वाहतूक पोलिसांची कारवाई सहन करुनही लोक हेल्मेट घालणे टाळतात. यावर उपाय म्हणून १ ऑगस्टपासून, इंदौर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल भरण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन करून हा आदेश देण्यात आला.
SL/ML/SL