जेडीयूचे अध्यक्षपदी पुन्हा एकदा नितीश कुमार
पाटना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा जेडीयूचे अध्यक्ष होणार आहेत. दिल्लीत पार पडलेल्या जनता दल यूनायटेड (जेडीयू) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्यी बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नितीश कुमार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. याबाबत जेडीयू नेते आणि बिहारचे मंत्री विजयकुमार चौधरी यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आज बिहारमध्ये सत्ताधारी जेडीयूमध्ये मोठा उलटफेर झाला आहे.
नितीशकुमार यांनी यापूर्वी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. २०६ ते २०२० पर्यंत ते जेडीयू अध्यक्ष राहिले आहे. लल्लन सिंह यांनी सांगितले की, ते लोकसभा निवडणूक लढणार आहेत. यामुळे निवडणुकीत व्यस्त होणार असल्याच्या कारणावरून आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
SL/KA/SL
29 Dec. 2023