महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी
नितीन काळे

मुंबई दि.३० :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची २०२२-२०२५ या कालावधीतील त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शेगाव, जि. बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत, वर्ष २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक श्री. नितीन काळे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे, वित्त व लेखा विभागातील सहाय्यक संचालक श्री. समीर भाटकर यांची सरचिटणीस आणि मंत्रालयातील अवर सचिव श्री. संतोष ममदापुरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १२ उपाध्यक्ष, ३ महिला उपाध्यक्ष, १९ विभागीय सहचिटणीस आणि १९ महिला सहचिटणीसांचीही निवड झाली.
या सभेसाठी राज्यातील विविध खात्यांमधील अधिकारी संघटनांचे जवळपास २०० प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या पहिल्या दिवशी मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. माजी अध्यक्ष श्री. विनोद देसाई यांनी महासंघाच्या वाटचालीचा गोषवारा सादर केला, तर सरचिटणीस श्री. समीर भाटकर यांनी त्रैवार्षिक अहवालाचे वाचन केले. याशिवाय, ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.
नवीन कार्यकारिणीची निवड:-
महासंघाच्या २०२५-२०२८ या वर्षासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे:
- अध्यक्ष: श्री. नितीन पांडुरंग काळे
- सरचिटणीस: श्री. समीर मुकुंद भाटकर
- कोषाध्यक्ष: श्री. संतोष ममदापुरे
उपाध्यक्ष:- - बृहन्मुंबई: डॉ. श्रीकांत तोडकर, श्री. प्रदिप सत्यनारायण शर्मा, श्री. प्रदिप विनायक रणपिसे
- कोकण: डॉ. संदिप तुकाराम माने
- कोल्हापूर: श्री. संजय शंकरराव शिंदे
- छत्रपती संभाजीनगर: श्री. शिरीष दत्तात्रय बनसोडे
- नाशिक: श्री. रमेश पुंडलीक शिसव
- अमरावती: डॉ. संदिप इंगळे
- नागपूर: डॉ. कमलकिशोर शंकरराव फुटाणे
- लातूर: श्री. बाळासाहेब रावण शेलार
*महिला उपाध्यक्ष:-(बृहन्मुंबई): डॉ. सोनाली गणेश कदम
*सहचिटणीस:-* - बृहन्मुंबई: श्री. ललीत खोब्रागडे, श्री. शेखर कल्याण धोमकर, श्री. लक्ष्मण हुशेन्ना धुळेकर
- कोकण: श्री. मनोज सुमन शिवाजी सानप, श्री. डॉ. राम दत्तात्रय मुंडे
- छत्रपती संभाजीनगर: श्री. संजयकुमार लिंगुराम भोसले, श्री. रविंद्र बाबुराव जोगदंड
- नाशिक: श्री. आबासाहेब आण्णासाहेब तांबे, श्री. चंद्रशेखर सुभाष खंबाईत
- अमरावती: श्री. कपिल सुरेश नांदगांवकर, श्री. यशपाल प्रकाश गुडधे
- नागपूर: श्री. योगेश्वर नारायण निंबुळकर, डॉ. शशिकांत तुळशीदास मांडेकर
- लातूर: डॉ. राजेंद्र शिवराम पवार, डॉ. प्रदीप दत्तात्रय आघाव
- महिला सहचिटणीस- बृहन्मुंबई: श्रीमती शिरीन संजू लोखंडे, श्रीमती सिद्धी सचिन संकपाळ
- कोल्हापूर: श्रीमती पुनम अमृत पाटील, श्रीमती सुनिता मधुकर नेर्लीकर
- छत्रपती संभाजीनगर: श्रीमती कुसुम अशोक चव्हाण
- नाशिक: श्रीमती सरोज आधार जगताप, श्रीमती सायली राजेंद्र पाटील
- अमरावती: श्रीमती सीमा बबनराव झावरे, श्रीमती डॉ. क्रांती नामदेवराव काटोले
- नागपूर: श्रीमती सुवर्णा खंडेलवाल-जोशी, श्रीमती कुमुदिनी श्रीखंडे-हाडोळे
- लातूर: श्रीमती डॉ. मृणाल प्रकाश जाधव
कल्याण केंद्र समन्वयक:- - श्री.आनंद कटके व सुदाम टाव्हरे
महासंघाच्या उभारणीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करून भविष्यातही या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या अनुभवाचा संघटना बांधणी आणि संघटना कार्यासाठी उपयोग व्हावा, त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन नेहमी लाभावे, या दृष्टीने या सभेत राज्य संघटक, समन्वयक, कार्यालय सचिव आणि कायम निमंत्रित पदावरील नियुक्तीही जाहीर करण्यात आल्या.
राज्य संघटक, समन्वयक, कार्यालय सचिव, कायम निमंत्रित पदावरील नियुक्ती:-
सर्वश्री रमेश जंजाळ, इंजि. विनायक लहाडे, विष्णु पाटील, बाळासाहेब घोरपडे, आर.जे.पाटील, डॉ. प्रमोद रक्षमवार, डॉ. उत्तमराव इंगळे, ए. एन. तिखे, विठ्ठलराव गुंजाळ, प्रल्हाद जावळे, मोहन साळवी, अशोक मोहिते, रामचंद्र देठे, डॉ. सुभाष मद्रेवार, डॉ. एस. एम. पाटील, प्रमोद वानखेडकर, गणेश राठोड, शिरीष तेलंग, दिगंबर सिरामे, आर.सी.शाह, अण्णाराव भुसणे, बापूसाहेब सोनावणे, डॉ. तरुलता धानके, शिवदास वासे, शिवाजीराव भोईटे, प्रा.अनंत धात्रक, सुनील गायमुखे व प्रा. राजेंद्र चौधरी, डॉ . अविनाश भागवत, इंजि.मोहन पवार यांची राज्य संघटक पदावर तर समन्वयक एस.के.भोरकडे व रजनीश कांबळे यांची कार्यालय सचिव आणि इंजि. मनोहर पोकळे, रवींद्र धोंगडे व डॉ. सुरेश मोरे यांची कायम निमंत्रित पदांवर निवड जाहीर करण्यात आली.
तसेच कार्यकारिणीची अन्य रिक्त पदे, संघटन सचिव, महिला संघटन सचिव, जनसंवाद सचिव आदि पदांवर सर्व जिल्ह्यांमधून सुयोग्य आणि महासंघाच्या कार्यासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संबंधित जिल्हा समन्वय समिती व विभागीय पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
या सभेतील प्रमुख ठराव आणि ध्येय:-
नवनिर्वाचित कार्यकारिणीने पुढील काळात काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे:
- जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे.
- महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे दोन वर्षांची बालसंगोपन रजा लागू करणे.
- सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० वर्षे करणे.
- विविध संवर्गातील वेतनत्रुटी दूर करणे.
- तसेच, महासंघाचे संस्थापक दिवंगत ग. दि. कुलथे यांचे स्वप्न असलेले कल्याण केंद्र उभारण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. संघटन आणि पुढील वाटचाल
या बैठकीत महासंघाचे संस्थापक कै.ग. दि. कुलथे यांच्या योगदानाला आदराने स्मरण करून, त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच, नव्या पिढीतील अधिकाऱ्यांनी महासंघाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. आर.जे.पाटील, श्री.कोटकर, श्री.बाविस्कर, श्री.भोरकडे, श्री.रजनीश, श्री.संदीप व इतर सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
येणाऱ्या काळात राज्यातील स्थानिक जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी संघटनांना एकत्रित आणून, त्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचेही ध्येय नवनियुक्त कार्यकारिणीने ठेवले आहे. त्याचबरोबर विभागवार /जिल्हानिहाय दौरे करुन जिल्हा शाखांची बांधणी करण्यावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली. त्या त्या जिल्ह्यांतील सेवानिवृत्त राज्य संघटकांचे विभागीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य घ्यावे, असेही ठरविण्यात आले. या सभेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ.संदीप इंगळे आणि बुलढाणा जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व इतर अधिकारी सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.ML/ML/MS