नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

 नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

पुणे दि १– आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रोहित टिळक, सुशील कुमार शिंदे , मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

1983 साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली.सर्व प्रथम एस एम जोशी यांना टिळक पुरस्कार पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे हे 43 वे वर्ष आहे. दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता मागील वर्षी हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना देण्यात आला.

लोकमान्य टिळक हे आमच्या साठी प्रेरणा स्थान आहे. त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला मी भाग्यवान आहे, टिळक हे राष्ट्रीय निर्माते होते. सत्ता कारणाचे रूपांतर हे समाज कार्यात झाले पाहिजे. स्वातंत्र्य हे राष्ट्र पुरुषांच्या बलिदानाने मिळाले आहे. अविचारी माणसे धाडसी निर्णय घेतात असे गडकरी आपल्या सत्काराच्या उत्तरात म्हणाले.

50 हजार कोटींची पुणे शहरात काम होणार आहेत. मुंबई बंगलोरचे काम लवकरच होणार आहे. स्वराज्य आणि समाज सुधारणा देखील पाहिजे. महाराष्ट्र सर्वात जास्त रेव्हेन्यू देत आहे. भारत आता 3 नंबर ची अर्थव्यवस्था आहे.
आत्मनिर्भर भारत चे स्वप आपले पूर्ण होणार आहे. आटोमोबाईल मध्ये भारत येणाऱ्या काळात होणार आहे लोकमान्यांचे स्वराज्याचे सुराज्य बनवण्याचे काम आपण केले पाहिजे असे ही गडकरी म्हणाले. टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपण केले पाहिजे असे गडकरी म्हणाले. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *