केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दूरदृष्टीला टिळक पुरस्काराची पावती – अशोकराव टाव्हरे

मुंबई, दि २४
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे त्यांचा दूरदृष्टीपणा आणि लोकहितकारी कार्याला मिळालेली पावती आहे. असे वक्तव्य विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या दोन्ही मराठी इंग्रजी पुस्तकाचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केले.
रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा यामधून फक्त प्रगतीच नव्हे, तर नव्या भारताचा आत्मविश्वासही गडकरी उभा करत आहेत. हा सन्मान त्यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाला मिळणं, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागपुर शहराध्यक्षापासून सुरू झालेला नितीनजी गडकरींचा प्रवास, २५ वर्षे विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधानपरिषद विरोधी पक्षनेते, केंद्रीय रस्ते विकास समितीचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष ते २०१४ पासून लोकसभेवर तिसर्यांदा निवड, केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री तसेच जलसंधारण, जहाजबांधणी, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग, गंगा नदी विकास, ग्रामविकास या विविध खात्यांची जबाबदारी सक्षमतेने सांभाळली.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग,मुंबईतील उड्डाणपुलांची उभारणी ही गडकरींच्या दूरदृष्टीची मोठी उदाहरणे आहेत. देशभरात रस्ते विकासाचे जाळे उभारून पायाभूत सुविधांमध्ये झालेला आमुलाग्र बदल अतुलनीय आहे. KK/ML/MS