नितीन गडकरी यांचे घर बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी, एक आरोपी ताब्यात..

नागपूर दि ३– नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घरात बॉम्ब ठेवले असून बॉम्बने घर उडविण्यात येईल अशी धमकी आल्याने खळबळ उडाली होती. या धमकीचे फोन नागपुर पोलिसांचा कंट्रोल रूम ला सकाळी 9 वाजता होता.. या धमकीनंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा घराचा बॉम्ब शोधक नाशक पथकाचा सहाय्याने घर आणि परिसरात कसून चौकशी केल्यानंतर ही धमकी म्हणजे फेक कॉल होते हे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तुळशीबाग रोड, महाल येथील विष्णू राऊत या आरोपीला अटक केली आहे.. ज्या फोन द्वारे धमकी दिली होती तो मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला असून धमकी देण्यामागे आरोपीचा काय उद्देश होता याचा तपास सुरक्षा यंत्रणा करीत आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ML/ML/MS