नितीन नबीन झाले भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष
नवी दिल्ली,दि. १९ : भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष नितीन नबीन हे आता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील. आज दिल्लीतील पक्ष मुख्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, या पदासाठी फक्त नितीन नबीन यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण ३७ नामांकन पत्रे दाखल करण्यात आली होती. नामांकन पत्रांची छाननी करण्यात आली आणि सर्व वैध आढळले. नितीन यांचे नाव २० जानेवारी रोजी औपचारिकपणे जाहीर केले जाईल. नितीन नबीन हे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
आजच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी नितीन यांच्या समर्थनार्थ नामांकन पत्र सादर केले.
भाजपने १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी अधिसूचना जारी केली. १४ डिसेंबर २०२५ रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
SL/ML/SL