कन्व्हींस करता येत नाही म्हणून कन्फ्युज करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
गडचिरोली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करीत आहे. खरं तर काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केली. परंतु लोकांना कन्व्हींस करता येत नाही म्हणून कन्फयूज करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आष्टी आणि कुरखेडा येथे केली.
रस्त्याचा विकास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अडचणीमुळे काही ठिकाणी थांबले आहे. हा जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते बोलले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला गडकरी यांनी संबोधित केले.
केशवानंद भारती खटल्यात घटनेची मुलभूत तत्त्वं बदलता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तरीही काँग्रेसनं विरोधात प्रचार केला. मात्र आम्ही घटना बदलणार नाही आणि कोणाला ती बदलूही देणार नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
ML/ML/PGB 15 Nov 2024