नितीन देसाई यांच्यावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार…

 नितीन देसाई यांच्यावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार…

अलिबाग, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात चौक येथे नितीन देसाई यांच्या पार्थिवावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यापूर्वी नितीन यांचे पार्थिव जेजे हॉस्पिटलमधून एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले होते, याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर, सिनेसृष्टीतील अभिनेते, राजकीय नेते, नातेवाईक, मित्र तसेच अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टुडिओमध्ये सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी केअरटेकर आणि ड्रायव्हरचे जबाबही घेतले आहेत. Nitin Desai cremated at ND Studio नितीन देसाई यांच्यावर सुमारे २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांची कंपनी एनडी स्टुडिओवर खूप कर्ज होते.

एका कंपनीकडून त्यांनी १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह, कर्जाची रक्कम २५० कोटींवर पोहोचली होती. कंपनीने वसुलीसाठी कायदेशीर पावले उचलली होती. स्टुडिओ जप्त करण्याचा प्रस्तावही कंपनीने तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवला होता. एनडी स्टुडिओ सील होण्याचीही शक्यता होती.

ML/KA/PGB
4 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *