नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलिसांनी ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 ऑगस्टला कलादिग्दर्शक आणि कर्जतमधल्या एनडी फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी चार ऑगस्टला नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी लेखी तक्रार दाखल केली. ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून माननसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असं या तक्रारीत म्हटलं होतं.
ML/KA/PGB
4 Aug 2023