नीता अंबानी कल्चर सेंटर आंतराष्ट्रीय स्तरावर पदार्पण

नीता अंबानी यांचं NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर) लवकरच न्यूयॉर्कमधील लिंकन सेंटरमध्ये सुरु होणार आहे. याच्या आंतराष्ट्रीय पदार्पणानिमित्त 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान भारतीय कला, संगीत, नृत्य आणि फॅशनचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात ‘ग्रँड स्वागत’ सह मनिष मल्होत्रा यांचे ‘स्वदेश’ कलेक्शन, संगीत कार्यक्रम आणि ‘The Great Indian Musical’ नाटकाचा समावेश असेल.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून NMACC चं आंतराष्ट्रीय पटलावर पदार्पण होईल. NMACC ची सुरुवात या सांस्कृतिक केंद्राची 2023 मध्ये मुंबईत झाली. नीता अंबानी यांनी ‘द मेट’ आणि ‘सिडनी ऑपेरा हाऊस’ यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थांकडून प्रेरणा घेतली.
या कार्यक्रमात शंकर महादेवन, श्रेया घोषाल आणि शास्त्रीय संगीतकार ऋषभ शर्मा यांच्या संगीताचे कार्यक्रम होतील. NMACC निर्मित आणि फिरोज अब्बास खान दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन म्यूजिकल: सिव्हिलायजेशन टू नेशन’ हे नाटक लिंकन सेंटरमध्ये आंतराष्ट्रीय पदार्पण करेल. या नाटकात भारताचा सात हजार वर्षांचा इतिहास संगीत, नृत्य आणि रंगमंच बदल करून दाखवण्यात आला आहे.