निसान इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हलचे आयोजन

 निसान इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हलचे आयोजन

गुरूग्राम, दि १९: निसान मोटर इंडिया आपल्या टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हलच्या अनावरणाद्वारे उत्सव साजरा करत आहे. हा संपूर्ण भारतभरातील उपक्रम आहे जो ग्राहकांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आणि देशभरातील डीलर्सकडे सातत्याने गर्दी वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीदरम्यान निसान मॅग्नाइटला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे तसेच भारत सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी दर कपातीच्या सकारात्मक परिणामामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये निसानने चांगली कामगिरी केली.

ही मोहीम ग्राहकांना निसानच्या उत्पादनांचा थरार अनुभवण्यासाठी आमंत्रित करते. त्यात ५-स्टार जीएनसीएपी-रेटेड न्यू निसान मॅग्नाइटचा समावेश आहे. तसेच सुरक्षितता, नावीन्य आणि ग्राहकांच्या सहभागासाठी ब्रँडची वचनबद्धता बळकट करते. ग्राहकांच्या सहभागासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून निसान मोटर इंडिया संभाव्य ग्राहकांना अलीकडेच जीएनसीएपीने प्रतिष्ठित ५-स्टार सुरक्षा रेटिंग दिलेली न्यू निसान मॅग्नाइट ही ब्रँडची प्रमुख कॉम्पॅक्ट एसयूव्ही चालवण्यासाठी आमंत्रित करत आहे. हा उपक्रम निसानच्या व्यापक अनुभवात्मक मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तो ग्राहकांशी संपर्क वाढवण्यासाठी आणि शोरूमची गती वाढवण्यासाठी जमिनीवरील सक्रियतेसह इमर्सिव्ह टेस्ट ड्राइव्ह संधी आणतो.

संपूर्ण नोव्हेंबरदरम्यान निसान मोटर इंडिया आपल्या टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हलचा भाग म्हणून त्यांच्या डीलरशिपना उत्साही समुदाय केंद्रांमध्ये रूपांतरित करत आहे. या उपक्रमात २४ प्रमुख शहरांमध्ये उत्सवी सजावट, परस्परसंवादी खेळ आणि लाइव्ह आरजे कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे एक तल्लीन करणारे आणि उत्सवी वातावरण निर्माण होईल. पर्यटक आकर्षक प्रश्नमंजुषेत सहभागी होऊ शकतात, रोमांचक भेटवस्तू जिंकू शकतात आणि आपल्या आवडत्या रेडिओ व्यक्तिमत्त्वांना भेटू शकतात आणि तेही ५-स्टार जीएनसीपीए-रेटेड न्यू निसान मॅग्नाइट चालवण्याचा थरार अनुभवत असताना. देशभरातील निसान शोरूममध्ये ग्राहकांशी संवाद वाढवण्यासाठी आणि उत्सवाची भावना जिवंत ठेवण्यासाठी ही मोहीम तयार केली गेली आहे.

“टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हल हा एक धमाल उत्सव आहे आणि न्यू निसान मॅग्नाइटच्या रोमांचाचा अनुभव घेण्यासाठी असलेले आमंत्रण आहे,” असे मत निसान मोटर इंडियाचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट धोरण संचालक मोहन विल्सन यांनी व्यक्त केले. “प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांपासून ते गतिमान कामगिरी आणि अतुलनीय मूल्यापर्यंत मॅग्नाइट आपल्या विभागात सातत्यपूर्ण राहण्याचा अर्थ काय आहे याचे उत्तम उदाहरण आहे. आम्हाला विश्वास आहे की ग्राहकांनी ही गाडी एकदा चालवली की त्यांना खरोखरच एक वेगळा ड्रायव्हिंग अनुभव मिळेल.”

टेलिव्हिजन, प्रिंट, रेडिओ, डिजिटल आणि सोशल प्लॅटफॉर्मचा समावेश असलेल्या ३६०-डिग्री मीडियाद्वारे ही मोहीम चालवली जात आहे. २४ प्रमुख शहरांमध्ये रेडिओ कार्यक्रमांमध्ये आरजेकडून आकर्षक पद्धतीने उल्लेख होईल आणि निसान डीलरशिपवर विशेष लाइव्ह आरजे संवाद असतील. त्यामुळे श्रोत्यांसाठी एक आकर्षक टचपॉइंट तयार होतील. तुमच्या जवळच्या निसान डीलरशिपला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे! २० नोव्हेंबरपूर्वी केलेल्या बुकिंगवर रोमांचक ऑफर्स आणि विशेष फायदे मिळवा. आणि एवढेच नाही – त्यानंतर लगेचच आणखी विशेष डील उपलब्ध आहेत!

• मोहिमेदरम्यान खास ऑफर्स
उत्साह आणखी वाढवण्यासाठी निसान डीलरशिप मोहिमेदरम्यान बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष फायदे देत आहेत:

(दक्षिण विभाग वगळता संपूर्ण भारत)
• एक्सचेंज फायदे: ₹६०,००० पर्यंत
• रोख फायदे: ₹१५,००० पर्यंत
• लवकर बुकिंग अतिरिक्त रोख लाभ: ₹११,००० पर्यंत

(दक्षिण विभाग)
• एक्सचेंज फायदे: ₹६०,००० पर्यंत
• रोख फायदे: ₹१०,००० पर्यंत
• वित्तपुरवठा @ ६.९९%
• लवकर बुकिंग अतिरिक्त रोख लाभ: ₹११,००० पर्यंत

बाजारपेठेतील आपल्या वेगवान वाढीत भर घालताना न्यू निसान मॅग्नाइटने अलीकडेच ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचण्यांमध्ये प्रतिष्ठित 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. त्यामुळे सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक म्हणून तिची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे. तसेच, ग्राहकांना संपूर्ण जीएसटी लाभ देऊन निसानने न्यू निसान मॅग्नाइटच्या किमती १ लाख रूपयांपर्यंत कमी केल्यामुळे एसयूव्ही आणखी सुलभ आणि अमूल्य झाली आहे. पूर्ण जीएसटी लाभामुळे किमती ₹१ लाख रूपयांपर्यंत कमी झाल्या आहेत आणि मेटॅलिक ग्रे रंगात कुरो स्पेशल एडिशन बाजारात आल्यामुळे निसान देशभरातील ग्राहकांना नवीन ऑफर आणि नावीन्यपूर्णतेसह प्रेरणा देत आहे.

आपली ६५ हून अधिक देशांमध्ये धाडसी उपस्थिती आणि विस्तारित व्याप्तीसह मेड-इन-इंडिया न्यू निसान मॅग्नाइट निसानच्या “एक कार, एक जग” तत्वज्ञानाचे मूर्त रूप ठरली आहे – ती भारतापासून जगापर्यंत गुणवत्ता, नावीन्य आणि उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करते.

मॅग्नाइटची टेस्ट ड्राइव्ह करण्यासाठी आणि टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हल उत्सवाचा भाग होण्यासाठी तुमच्या जवळच्या निसान डीलरशिपला भेट द्या.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *