अजितदादांचा अपघाती मृत्यु अन् मंत्रालय निर्मनुष्य
मुंबई, दि २९
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाला त्याचे पडसाद आज मंत्रालयात पाहायला मिळाले. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर त्यांच्या दालनामध्ये नागरिकांची रोजच मोठया प्रमाणात गर्दी असते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक मंडळी मंत्रालयात आपली शासकीय कामे करण्यासाठी सहाव्या मजल्यावर येत असतात. मंगळवारीच मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीसाठी अजितदादा मंत्रालयात आले होते. अनेक नागरिकांनी आपली शासकीय कामे करण्यासाठी काल अजितदादांची भेट देखील घेतली होती. त्यातील काही नागरिकांची कामे झाली तर काही नागरिकांना अजितदादानी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांची कामे करावी असे निर्देश त्यांच्या निवेदनावर दिले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. हे असे दुर्दैवी घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. आज राज्य शासनाने तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला असून पुढील तीन दिवस मंत्रालय बंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळाला. तर अनेक मंत्रालयातील कर्मचारी आणि पोलिस बांधव मंत्रालयातील.सहाव्या मजल्यावर अजित दादांच्या जालना वरती पाटील आता यापुढे दिसणार नाही. तसेच दालनाचा मुख्य दरवाजा अजित दादा ची वाट देखील पाहणार नाही. कारण की अजित दादांच्या या आकस्मिक निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग देखील आता पोरके झाले आहे. त्यासोबतच सहाव्या मजल्यावरील अजितदादांचे दालन देखील पोरके झाले आहे.KK/ML/MS