भीषण रस्ते अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू…

 भीषण रस्ते अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू…

पुणे,दि .१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या अपघातात नऊ जण ठार असून काहीजण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण अपघातात झालेल्या 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे म्हटले आहे.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.

मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे असे फडणवीस यांनी सांगितले.

ML/ML/SL

17 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *