निळवंडे धरणाचे पाणी अखेर लाभक्षेत्रात पोहोचले

अहमदनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे निळवंडे धरणाचे पाणी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून पहिली चाचणी घेण्यात आली. उत्तर अहमदनगर जिल्हयातील 182 गावांना वरदान ठरणा-या निळवंडे धरणाच्या कालव्यांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास सुरूवात झाली. निळवंडे कॅनॉलच्या पाण्याने साई समाधीला जलाभिषेक करणार असून 182 गावातील शंकराच्या मंदिरात देखील तेथील शेतकरी जलाभिषेक करणार आहेत. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील उपस्थित होते. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी प्रतिक्षा होती. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल 2023 अखेर 5700 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. या धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काली भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हे धरण महत्वपूर्ण ठरणार आहे.

ML/KA/PGB 31 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *